मुख्य बातमीशैक्षणिक

एस. पी. हेगशेट्ये कॉलेजच्या ‘जीएस’पदी अमान बारगीर याची निवड 

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरी (जीएस) पदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यात कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या अमान बारगीर याची निवड करण्यात आली.

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात जीएस पदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी तीन टप्प्यात मुलाखती घेऊन शेवटी अमान बारगीर आणि हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकणारा समर्थ बिर्जे यांच्यात निवडणूक झाली. यात अमान बारगीरला सर्वाधिक मते मिळाली.

आता आपली जबाबदारी आणखी वाढली असून, अभ्यासाबरोबरच महाविद्यालयात आता लवकरच क्रीडा महोत्सव आणि तरुणाईचे आकर्षण असलेले डेज सुरू होतील. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधून प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेनुसार पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त जीएस अमान बारगीरने सांगितले.

दरम्यान, अमानची जीएसपदी निवड झाल्याबद्दल नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, चीफ एक्झिक्युटिव्ह मंदार गिते, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, स्टुडंट्स हेड प्रा. अहलाम खान यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुखांनी अमान याचे कौतुक केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button