मुख्य बातमी

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बोगस फेसबुक खाते 

कोणतीही माहिती न देण्याचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह त्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून त्यावरून मैत्रीची विनंती पाठविली जात आहे. अशा कोणत्याही विनंतीला स्वीकारू, नये असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.

“Devendra Shing”, “Devendra Singh, IAS, Ratnagiri Collectorate”, किंवा “Devender Singh” अशा नावाने बोगस फेसबुक खाते तयार करून मैत्रीची विनंती पाठविली जात आहे आणि त्याद्वारे बँकखाते नंबर व मोबाईल नंबर मागविला जात आहे किंवा जुने फर्निचर, साहित्य विक्री ची माहिती देऊन ते खरेदीसाठी प्रवृत्त केले जाते.

अशा प्रकारे आतापर्यंत अनेकवेळा वेगवेगळ्या नावाने बनावट खाते तयार करून फ्रेंड रिक्वेस्ट केली जात असल्याने याबाबत वेळोवळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सायबर पोलीस स्टेशनकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे. यासंदर्भात नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून वरीलप्रमाणे फेसबुक अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट प्राप्त झाल्यास, फोन करून एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी रत्नागिरी अशा नावाने मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आणि बँक अकाउंट नंबर विचारल्यास, किंवा अन्य वस्तू खरेदी-विक्री साठी विचारणा केल्यास कोणतीही माहिती देण्यात येवू नये,असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांच्या नावाने अशा प्रकारे कोणतीही माहिती फेसबुक खात्याद्वारे मागविली जात नाही. यांसदर्भात फेसबुकद्वारे किंवा फोनद्वारे जनतेला अशा प्रकारच्या माहितीची विचारणा केल्यास आवश्यक वाटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button