मुख्य बातमी

शिवसैनिकांनी निराश होऊ नये : डॉ. प्रतीक झिमण

रत्नागिरी : “नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यभर शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांना अपयश आले आहे. या अपयशाने आपण बिलकुल खचून जाता कामा नये, आपण बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत. आपल्याला आलेल्या अपयशाचे आपण आत्मचिंतन करू आणि नव्या जोमाने जनतेची सेवा करू”, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. प्रतीक झिमण यांनी सांगितले.

ते म्हणाले, “कोणीही निराश होऊ नका, आपले पक्षप्रमुख, सन्माननीय नेतेमंडळी आपल्याला लवकरच मार्गदर्शन करतील. यापुढे आपण सर्वांनी एकजूट कायम ठेवूया. विरोधकांवर टिका करत बसण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू.” संघटनेतील त्रुटी सुधारून अधिक जोमाने काम करूया, असे आवाहनही डॉ. झिमण यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button