मुख्य बातमीसाहित्य-कला
‘माझ्या आजीचा बॉयफ्रेंड’ २६ नोव्हेंबरला रत्नागिरीत

रत्नागिरी : प्रसिद्ध नाट्य व सिने निर्माते राजेश देशपांडे लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित शिवाई सहकारी पतसंस्थेचे ‘माझ्या आजीचा बॉयफ्रेंड’ हे धमाल विनोदातून नाते संबंधावर भाष्य करणारे नाटक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाटयगृह रत्नागिरी येथे सादर होणार आहे.
६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रातल्या स्पर्धेचा प्रारंभ याच नाटकाने होणार आहे. सर्व नाट्य रसिकांनी या नाटकाचा आणि इतर सर्व नाटकांचा आनंद घेऊन नवोदित कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सृजन द क्रिएशन संस्थेचे प्रमुख राजेश देशपांडे यांनी केले आहे.



