क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

देवरुखमध्ये २४ नोव्हेंबरला कब्बड्डी निवड चाचणी स्पर्धा 

संगमेश्वर : तालुक्यातील कुमार/कुमारी वयोगटातील कब्बड्डी खेळाडूंसाठीची निवड चाचणी स्पर्धा २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून देवरुख शहरातील रामराजे कॉलेजच्या क्रीडांगणावर (कुणबी भवन) आयोजित करण्यात आली आहे.

ही निवड चाचणी स्पर्धा संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली असून यातून निवडलेला संगमेश्वर तालुक्याचा कुमार/कुमारी गटाचा संघ १ डिसेंबर रोजी कुंभार्ली (ता. चिपळूण) येथे रत्नागिरी जिल्हा कुमार/कुमारी गटाच्या निवड चाचणी स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करेल.

या निवड चाचणी साठी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनने निकष आणि नियमावली जाहीर केली असून त्याची पूर्तता करणाऱ्या खेळाडूंचाच निवडीसाठी विचार करण्यात येईल. निवड चाचणी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूचा जन्म १ जानेवारी २००५ नंतरचा असावा. कुमार गटासाठी वजन ७० किलो आणि कुमारी गटासाठी वजन ६५ किलोपेक्षा जास्त नसावे.

इच्छुक खेळाडूंनी वयाचा दाखला म्हणून पूर्ण जन्मतारीख असलेल्या आधार कार्डाची मूळ प्रत सोबत आणावी. आधार कार्ड वर पूर्ण जन्मतारीख नसल्यास फोटो लावलेले शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, शालांत परीक्षा (१०वी/१२वी) चे हॉल तिकीट (मूळ प्रत), फोटो असलेला जन्मदाखला ही प्रमाणपत्रे वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील याची नोंद घ्यावी.

या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणारा खेळाडू रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनकडे नोंदणीकृत (Registered) असणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी संतोष दामुष्टे (९४२२३७१७९९), अभिजीत सप्रे (९४२३२९२८३३), सुधीर सावंत ९४०५५९६७१६), गणेश मोहिते (९९६०३१२१९४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button