राष्ट्रीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत सुरभी पाटीलला कांस्य पदक

रत्नागिरी : विदीशा (मध्यप्रदेश) येथे ८ ते १२ नोंव्हेबर या कालावधीत झालेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत गणराज क्लबच्या सुरभी तेजस्वी राजेंद्र पाटील हिने कांस्य पदक प्राप्त केले.
या स्पर्धेत संपूर्ण भारतातून सुमारे २ हजार ८०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सुरभीची ही चौथी राष्ट्रीय स्पर्धा आहे. सुरभीला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय पंच, महाराष्ट्र राज्य स्वयंसिद्धा प्रशिक्षक प्रशांत मनोज मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणराज क्लबने नेहमीच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. सुरभीला आई व बाबा यांच्या मोलाचा वाटा आहे.
सुरभीने मिळवलेल्या यशाबद्दल पोतदार शाळेचे मुख्याध्यापक राकेश चव्हाण, क्रीडा शिक्षक सौ. सपना साप्ते, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिदें यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर, जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी तसेच गणराज क्लबचे पदाधिकारी अभिजीत विलणकर, नुतन कीर, रंजना मोडूंळा, साक्षी मयेकर, कनिष्का शेरे, यशंवत शेलार, पुजा कवितके, एस.आर.के चे प्रशिक्षक शाहरुख शेख, जयभैरीचे प्रशिक्षक मिलिंद भागवत, पालक आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.



