मुख्य बातमी

रत्नागिरीत ईद-ए-मिलादे नबी मोठ्या उत्साहात साजरी

रत्नागिरी : शहरामध्ये आज ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी धनजीनाका ते मारुती मंदिर मार्गे थिबा पॅलेस मार्गावरती एक रॅली काढण्यात आली.

कोकण नगर ते मारुती मंदिर मार्गे उद्यमनगर होऊन पुन्हा कोकण नगर येथे दावते इस्लामी यांची एक ईद-ए-मिलादची रॅली काढण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे वयोवृद्ध, जाणकार लोक तसेच लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये चार चाकी गाडी, टेम्पो, दुचाकी घेऊन लोक सहभागी झालेले दिसत होते.

या दोन्ही रॅलीचे स्वागत मारुती मंदिर येथे श्री रत्नागिरीचा राजा आणि उदय सामंत प्रतिष्ठान यांच्यावतीने पुष्पगुच्छ व पेढे वाटून स्वागत करण्यात आले. यावेळी दोन्ही धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जमलेल्या नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन ईद-ए-मिलाद मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले चित्र दिसत होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सलोखा आजच्या रॅलीमध्ये दिसत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button