मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

अर्ज मागे घेण्यासाठी अपक्ष उमेदवार संतोष जैतापकर यांची हेलिकॉप्टरमधून इंट्री

महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा प्रचार करणार

गुहागर : भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले संतोष जैतापकर यांनी अचानक अर्ज मागे

घेण्याच्या अर्धा तास आधी हेलिकॉप्टरने इंट्री करत आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. महायुतीच्या विजयासाठी एक पाऊल मागे घेतल्याचे वक्तव्य त्यांनी केले असून महायुतीचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

गुहागर विधानसभा निवडणुकीत यावेळी मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. महायुतीकडून शिंदे गटाचे राजेश बेंडल रिंगणात असून ऐनवेळी शिवसेनेत

प्रवेश करून भाजपला धक्का दिला आहे. त्यातच भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र, जैतापकर यांनी सोमवारी (४ नोव्हेंबर) अचानक अर्ज मागे घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

अर्ज दाखल करताना जैतापकर यांनी, मी ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून येईन, असे वक्तव्य केले होते; मात्र अचानक एका रात्रीत जादूची काडी फिरल्यासारखे झाले आणि जैतापकर यांनी अर्ज मागे घेऊन एक पाऊल मागे घेऊन मी महायुतीबरोबर असून बेंडल यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावेन, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र, जैतापकर यांनी सोमवारी अचानक अर्ज मागे घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

अर्ज दाखल करताना जैतापकर यांनी, मी ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून येईन, असे वक्तव्य केले होते. मात्र, अचानक एका रात्रीत जादूची काडी फिरल्यासारखे झाले आणि जैतापकर यांनी अर्ज मागे घेऊन एक पाऊल मागे घेऊन मी महायुतीबरोबर असून बेंडल यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावेन, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button