Uncategorizedमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

भाजपाच्या विधानसभा क्षेत्र समन्वयक उल्का विश्वासराव यांचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश

राजापूर : भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा क्षेत्र समन्वयक उल्का विश्वासराव यांनी आज (२९ ऑक्टोबर) आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. शहरातील मातोश्री हॉलवर झालेल्या या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजन साळवी, शिवसेना नेते अजित यशवंतराव, तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

राजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या त्या प्रमुख पदाधिकारी होत्या. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली असून, राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक म्हणून त्यांनी यशस्वी काम केले होते. पक्ष वाढीसाठी त्यांचे मोलाचे योगदान होते. दोन दिवसापूर्वी त्यांनी भाजपमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

आज राजापुरातील मातोश्री सभागृहात झालेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ठाकरे सेनेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button