क्रीडामुख्य बातमीशैक्षणिक

कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत ‘नवनिर्माण हाय’चे यश

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात हर्षदा मोहिते हिला रौप्यपदक 

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यामाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्या वतीने कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलच्या हर्षदा अशोक मोहिते हिने १७ वर्षांखालील मुलींच्या गटात रौप्यपदक संपादन केले.

या स्पर्धा वारणा मंगल कार्यालय मार्कट यार्ड (सांगली) येथे २६ तआणि २७ ऑक्टोबर रोजी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत नवनिर्माण हाय या प्रशालेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी हर्षदा मोहिते ही मुलींच्या १७ वर्षांखालील वयोगटात ३५ ते ३८ किलो आतील वजनी गटात रौप्यपदक संपादन केले. हर्षदा ही शहरातील साळवी स्टॉप शाखा येथील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षण घेत असून तिला तायक्वांदोचे तज्ञ प्रशिक्षक राम कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

हर्षदा हिने मिळविलेल्या यशाबद्दल नवनिर्माण विद्यालयाचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, मुख्याध्यापक अरविंद पाटील, क्रीडा शिक्षक अमृत गोरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button