मुख्य बातमीसाहित्य-कला

‘स्वराभिषेक’तर्फे १ नोव्हेंबरला सांगीतिक फराळ

जयेश मंगल पार्क येथे दिवाळी पहाट मैफल

रत्नागिरी : येथील स्वराभिषेक आणि जयेश मंगल पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजनाच्या पहाटे ५.३० वाजता दिवाळी पहाट मैफलीचे आयोजन करण्यात आले असून रसिकांसाठी सांगीतिक फराळाची मेजवानी मिळणार आहे.

या मैफलीत स्वराभिषेकचे शिष्यवर्ग शास्त्रीय, सुगम, भाव-भक्तीगीते सादर करणार आहेत. संगीत संयोजन स्वराभिषेक संगीतवर्गाच्या संचालिका विनया परब यांनी केले आहे. मैफलीसाठी महेश दामले (हार्मोनियम), मंगेश मोरे (सिंथेसायझर), मंदार जोशी (बासरी), केदार लिंगायत (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज) आणि अद्वैत मोरे (तालवाद्य) हे कलाकार संगीतसाथ करणार असून ध्वनिसंयोजन एस. कुमार साऊंडचे उदयराज सावंत करणार आहेत. तसेच दीप्ती आगाशे, मधुरा लाकडे आणि पूर्वा साने हे शिष्य निवेदनाची बाजू सांभाळणार आहेत.

ही मैफल रसिकांसाठी विनामूल्य असून या सांगितिक फराळाचा आस्वाद रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन स्वराभिषेक आणि जयेश मंगल पार्कतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button