Uncategorizedमुख्य बातमीविधानसभा निवडणूक २०२४

जिल्ह्यात १६ उमेदवारांची १९ नामनिर्देशनपत्र दाखल

रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजच्या दिवशी १६ उमेदवारांनी १९ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

आज दाखल झालेल्या विधानसभा मतदार संघनिहाय नामनिर्देशन पत्रांची माहिती अशी : २६३ दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये योगेश रामदास कदम- शिवसेना (प्रस्तावकामार्फत दाखल), ज्ञानदेव रामचंद्र खांबे (अपक्ष), सुनील पांडुरंग खाडे (अपक्ष), संतोष सोनू अबगुल (महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अपक्ष) अशी २ नामनिर्देशनत्रे दाखल केली आहेत.

२६४ गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप हरी फडकले (अपक्ष), विक्रांत भास्कर जाधव- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), राजेश रामचंद्र बेंडल (शिवसेना), प्रमोद सीताराम गांधी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आणि प्रमोद परशुराम आंब्रे (राष्ट्रीय समाज पक्ष) अशा एकूण ५ उमेदवारांची ५ नामनिर्देशन पत्रे दाखल केली.

२६५ चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये शेखर गोविंदराव निकम (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) यांनी २ नामनिर्देशन पत्र आणि सुनील शांताराम खंडागळे (अपक्ष) अशा २ उमेदवारांनी ३ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.

२६६ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेंद्रनाथ यशवंत माने – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी १ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

२६७ राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये अमृत अनंत तांबडे (अपक्ष), अविनाश शांताराम लाड (अपक्ष), संदीप विश्राम जाधव (बहुजन समाज पार्टी), राजन प्रभाकर साळवी- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी २ नामनिर्देशन पत्र असे एकूण ४ उमेदवारांची ५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button