मुख्य बातमी

राजापूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याची राज्यसेवा स्वच्छता निरीक्षकपदी निवड

प्रमित जाधव यांचे यश

राजापूर : नगर पालिकेत ७ नोव्हेंबर २०१९ पासून आरोग्य विभागात कार्यरत असणारे सफाई कर्मचारी प्रमित प्रकाश जाधव यांची रत्नागिरी नगरपालिकेत स्वच्छता निरीक्षकपदी (Sanitary Inspector) निवड झाली आहे. आजपासून (२२ ऑगस्ट) प्रमित यांनी रत्नागिरी नगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

प्रमित यांनी सफाईचे काम करत असतानाच गेली अनेक वर्षे स्वच्छता निरीक्षक या पदाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला होता. अभ्यास सुरू असतानाच असंख्य अडचणींवर मात करत प्रमित यांनी स्वच्छता निरीक्षक पदाला गवसणी घातल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. प्रमित यांना राजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले व अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button