मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेतून देशभक्ती जोपासली जात आहे – प्रसिद्ध आरोग्यतज्ञ डॉ. परदेशी 

भाई हेगशेट्ये ज्युनिअर कॉलेज, संगमेश्वर मध्ये देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा 

संगमेश्वर :- देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेतून देशभक्ती रुजवावी जे तुम्हाला आवडते ते तुम्ही करावे आयुष्यात सोशल मीडियाचा वापर चांगल्यासाठी करा, मार्ग अनेक शोधा मात्र एकाच मार्गाने वाटचाल करा. असे प्रतिपादन प्रसिद्ध आरोग्यतज्ञ डॉ.परदेशी यांनी केले.

भाई हेगशेट्ये ज्युनिअर कॉलेजच्यावतीने आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेच्या वेळी ते बोलत होते नवनिर्माण शिक्षण संस्थेने देशभक्ती रुजवण्याचे काम केले असून देश सेवेसाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी केले. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि गायक स्वप्नील चिले बोलताना म्हणाले की मी या महाविद्यालयामुळे घडलो असून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत मर्यादित न राहता आपले कौशल्य ओळखून तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊन आपली पुढील वाटचाल करावी असे म्हणाले. स्पर्धा परीक्षक माधवी भिडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत गायन सादर केले.

या स्पर्धेच्या वेळी संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, आरोग्य तज्ञ डॉक्टर रवींद्र परदेशी, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रज्ञा कदम, प्राचार्य संजना चव्हाण, किरण गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी छोट्या गटांमध्ये ८ संघ आणि मोठ्या गटांमध्ये ८ संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट विभाग, नवनिर्माण पब्लिक स्कूल, नवनिर्माण नर्सिंग महाविद्यालय आणि नवनिर्माण महाविद्यालय विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक संतोष खरे आणि नेहा वायंगणकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button