मुख्य बातमी

रत्नागिरीच्या देवतांना बाळ माने यांचे साकडे

रत्नागिरी : शहरातील ग्रामदैवत व इतर मंदिरांतील देवतांचे दर्शन घेऊन माजी आमदार बाळ माने यांनी विधानभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी साकडे घातले. याप्रसंगी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी विविध मंदिरांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी भेटीगाठी घेतल्या.

ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात बाळ माने यांनी पुष्पहार, श्रीफळ, पेढे अर्पण करून आशीर्वाद घेतला. तसेच बाळ माने यांच्या उमेदवारीसाठी साकडे घालण्यात आले. त्यानंतर राम आळी नाक्यावरील श्री राम राम मंदिर, श्री राधाकृष्ण मंदिर त्यानंतर दक्षिणाभिमुख हनुमान मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले. तेथेही भाजपच्या विजयासाठी देवाला साकडे घालण्यात आले. तसेच माजी आमदार बाळ माने यांनाही विधानसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरीतून उमेदवारी मिळावी आणि निरामय आरोग्य लाभावे याकरिता साकडे घातले. कार्यकर्त्यांनी या वेळी जल्लोष केला.

याप्रसंगी सौ. माधवी माने, भाजपा शहराध्यक्ष राजन फाळके, नंदू चव्हाण, विक्रम जैन, सतेज नलावडे, मंदार खंडकर, बाबू सुर्वे, दादा ढेकणे, अमित विलणकर, नीलेश आखाडे, मनोज पाटणकर, नितीन जाधव, संतोष बोरकर, प्रणाली रायकर, सुप्रिया रसाळ, बावा नाचणकर, प्रियल जोशी, सायली बेर्डे, शैलेश बेर्डे, ज्ञानेश पोतकर यांच्यासमवेत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी नाक्यानाक्यावर अनेकांनी बाळ माने यांना सदिच्छा दिल्या. विठ्ठल मंदिरात माजी नगराध्यक्ष प्रमोद रेडीज यांनी संवाद साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button