कोकण विभागीय झोन व्हॉलीबॉल स्पर्धेत एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचा तृतीय क्रमांक
चार विद्यार्थ्यांची कोकण झोन ४ संघात निवड

रत्नागिरी : देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथे नुकत्याच झालेल्या कोकण विभागीय झोन ४च्या व्हॉलीबॉल स्पर्धेत रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. महाविद्यालयातील दुर्गेश सावंत, संकेत राजवाडकर, साईराज शर्मा, अभिषेक नाईक या चार विद्यार्थ्यांची निवड कोकण झोन ४ च्या संघात करण्यात आली आहे.
देवगड येथील एस. एच. केळकर महाविद्यालयात आयोजित या स्पर्धेत २२ संघ सहभागी झाले होते. यात रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचा समावेश होता. या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत दुर्गेश सावंत, संकेत राजवाडकर, साईराज शर्मा, अभिषेक नाईक या विद्यार्थ्यांनी आपल्या चमकदार कामगिरीने कोकण झोन ४ च्या संघात स्थान पटकावले आहे. व्हॉलीबॉल युनिव्हर्सिटी टीम अशी :
सिहाब पागारकर, संकेत राजवाडकर, वेदांत घोसाळे, दुर्गेश सावंत, साईराज शर्मा, सर्वेश बारगोडे, अभिषेक नाईक, साई कानसरे, राज चव्हाण, ओमकार मसुरकर, मिहीर मयेकर, आशु नाईक.
महाविद्यालयाच्या संघातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सुशील साळवी यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाला तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल तसेच कोकण झोन चारच्या संघात विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, प्रभारी प्राचार्य प्रा. सुकुमार शिंदे यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्गाने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



