मुख्य बातमी

शब्दवेध अभिवाचन, निबंध स्पर्धेला प्रतिसाद

रत्नागिरी : श्रीमान मंगेश बापुजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात ‘शब्दवेध’ अभिवाचन आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी शहरातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश होता. दोन्ही गटात अनेक स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

रंजनमंदिर येथे पार पडलेल्या अभिवाचन स्पर्धेचे परीक्षण अनिल दांडेकर यांनी तर निबंध स्पर्धेचे परीक्षण नेवरेकर यांनी केले. या वेळी गुणवत्ता सुधार समिती प्रमुख वालावलकर, बेंदरकर, पर्यवेक्षिका जाधव, मुख्याध्यापक के. डी. कांबळे आदी मान्यवरांनी रत्नागिरीत प्रथमच आयोजित केलेल्या अभिवाचन स्पर्धेचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. स्पर्धांकरिता तेजस फाउंडेशनतर्फे रा. भा. शिर्के प्रशालेचे माजी शिक्षक देवळेकर यांनी मातोश्री सुभद्रा आणि वडील तानाजी यांच्या समरणार्थ बक्षीस दिले.

स्पर्धेचा गुणानुक्रमे निकाल असा : निबंध स्पर्धा : गट १- दिव्यांका घाटगे (पटवर्धन हायस्कूल), वर्धन होळकर, सुधन्वी पावसकर (फाटक हायस्कूल), सई प्रभुदेसाई (जीजीपीएस); गट २- वीणा काळे (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), सावरी झगडे (विजू नाटेकर ज्युनिअर कॉलेज), चंदना घवाळी (अभ्यंकर-कुलकर्णी), मृणाली तारवे (पटवर्धन ज्युनियर कॉलेज), केतकी पुरोहित (अभ्यंकर-कुलकर्णी). अभिवाचन स्पर्धा : गट १ (९वी,१०वी)- फाटक हायस्कूल (स्वरांगी गोरे, पर्णवी प्रभुदेसाई, अर्पिता बापट), शिर्के प्रशाला (वैष्णवी चौघुले, शताक्षी भुर्के), पटवर्धन हायस्कूल (पूर्वा माइणकर, दिव्यांका घाटगे), गोदुताई जांभेकर विद्यालय (मंजिरी सावंत), जीजीपीएस (बिल्वा रानडे). गट २ (११वी,१२वी)- श्रीमान मंगेश बापुजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालय (शिवानी कोळी, आरती हरनाळ), अभ्यंकर-कुलकर्णी (अथर्व तेंडुलकर, विदुला कुलकर्णी, श्रावणी खांडेकर), अभ्यंकर-कुलकर्णी (ऐश्वर्या सावंत, पौर्णिमा ढोकरे, स्वरदा केळकर), तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालय (सिद्धी पड्याळ, श्रावणी नागवेकर), पटवर्धन ज्युनियर कॉलेज (श्रावणी शिंदे).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button