ओझरे जिल्हा परिषद गटातील उबाठा शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

संगमेश्वर : तालुक्यातील ओझरे जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिकांनी भाजप जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत व तालुका अध्यक्ष रूपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि तालुका उपाध्यक्ष विजय ऊर्फ बाबु गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. भाजपा नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपामध्ये पक्षप्रवेश करायला इच्छुक असल्याचे चित्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे भारतीय जनता पार्टी ताकद रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढत आहे. झालेल्या पक्षप्रवेशामध्ये प्रवेशकर्त्यांमध्ये संतोष सनगले, सीताराम सनगले, लक्षक सनगले, हर्षद सनगले, वंदना सनगले, श्रुती सनगले, संस्कार घडशी, तेजस घोगरे आदींचा सामावेश आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रश्मी कदम, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे , सरचिटणीस अमित केतकर, हातिव गावचे सरपंच नंदकुमार कदम, वाशी गावच्या सरपंच सौ. तन्वी गानु, युवा तालुका उपाध्यक्ष अक्षय शिंदे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



