मुख्य बातमीराजकीय

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारी कामाचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांच्या सोयी सुविधा आणि व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्य शासन, मुंबई महापालिका, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन, जिल्हाधिकारी सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी (१ ऑक्टोबर) सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे घेण्यात आली.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे पदाधिकारी आणि रिपब्लिकन पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button