कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे आज जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे हे आज (३० सप्टेंबर) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा सविस्तर दौरा असा : सकाळी १० ते ११.३० वाजेपर्यंत कार्यकर्ता संवाद ,चर्चा. स्थळ – भारतीय जनता पार्टी कार्यालय – कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलाजवळ रत्नागिरी. सकाळी ११.३५ ते १२.३०: रत्नागिरी नगर पंचायत कार्यक्रम.. स्थळ – दामले हायस्कुल, रोबोटीक lab उदघाटन समारंभ – नाचणे रोड, रत्नागिरी. दुपारी १२.३० ते १.३० : राखीव. दुपारी १.३० ते ३.३० : जिल्ह्यातील शाळांना आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मंजूर डिजटल शैक्षणिक साहित्य वाटप – स्थळ – जिल्हा नगर वाचनालय, रत्नागिरी. दुपारी ३.३५ ते ५.३०:- रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. बाबुराव जोशी यांच्या जयंती समारंभास उपस्थिती आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा तसेच कै. मालतीबाई जोशी आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.



