मुख्य बातमीशैक्षणिक

वेळ आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे : यशवंत शितोळे

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात 'करिअर कट्टा' कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने वेळेचे नियोजन करत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपले करिअर उज्वल करावे, असे मत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले.

रत्नागिरीतील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये ‘करिअर कट्टा’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन आज (२७ सप्टेंबर) करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डीबीजे महाविद्यालयातील प्रा. भादुले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

प्लेसमेंट सेल करियर कट्टा अंतर्गत विद्यार्थी संवाद शासनाच्या पोलीस भरती केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र, कौशल्य विकास केंद्र यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत त्यांनी शासनाचे विविध करिअरचे उपक्रम समजावून सांगितले. बदललेल्या काळाचा अंदाज घेऊन विद्यार्थ्यांनी करिअरच्या वाटा आत्मसात करून आपले योग्य करिअर निवडून त्यानुसार योग्य नियोजन करावे व आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन यावेळी श्री. शितोळे यांनी विद्यार्थ्यांना केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुकुमार शिंदे यांनी केले. आभार प्रा. सचिन गिलबिले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button