Uncategorized

महाराष्ट्रातले सर्व आगार बंद करण्याचा राज्य एसटी कामगार संघटनेचा इशारा

एसटी चालकाला टोल कर्मचाऱ्यांनी केलेल्या अमानुषपणे मारहाणीचा निषेध

गुहागर : खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावर गुरुवारी सायंकाळी एसटी चालकास दहा ते पंधरा टोल कर्मचाऱ्यांनी अमानुषपणे मारहाण केली; मात्र गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ होत होती. मारहाण करणाऱ्या टोळक्यावर योग्य कारवाई न झाल्यास महाराष्ट्रातले सर्व एसटी आगारातील काम बंद करू, असा इशारा महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.

याबाबत एसटी चालक प्रवीण भगवान नांगरे (३४) यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार ते गुरुवारी एसटी बस एम. एच. २० बी. एल. १२४८ ही बस चालवत गुहागरवरून स्वारगेटला जात होते. त्यावेळी त्यांच्या बसला शिवापुर टोल नाक्यावर एका ट्रक चालकाने कट मारला व तो टोल नाका पार करून पुढे थांबला. त्यावेळी नांगरे यांनी एसटी बाजूला लावून ट्रक चालकाला जाब विचारला, त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी विशाल जाधव यांनी तू तरी कुठे एसटी नीट चालवतो, असे बोलल्यानंतर शिवीगाळ करून मारायला सुरुवात केली. टोलवरील इत्तर कर्मचाऱ्यांनी तेथे येऊन त्यांनी देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करणारे साधारण १० ते १५ जण होते, त्यामध्ये चालक नांगरे जबर जखमी झाले. तसेच सोडवण्यासाठी आलेल्या एसटीच्या वाहकाला देखील मारहाण केली.
एसटीमधील प्रवाशांनी व इतरांनी फोनवरून जवळच्या पोलीस चौकीला माहिती दिली; मात्र घटना घडून दोन तास झाले तरी पोलीस टोलनाक्यावर फिरकले नाहीत. उलट तुम्हीच एसटी घेऊन शिवापुर चौकीला या असे सांगण्यात आले.

याप्रकरणी तेथील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही. मारहाण करणाऱ्या सर्वांना अटक करून योग्य ती कारवाई व्हायला हवी. कोणाच्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. तसे न केल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल असे इतर संघटनांनीही सांगितले आहे. दरम्यान टोल नाक्यावरील मारहाण करणा-यांना येथील पोलीस पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास आले याबाबत मी आमच्या एसटी कामगार युनियनकडे दाद मागणार आहे. असे एसटी चालक प्रवीण भगवान नांगरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button