मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

२५ सप्टेंबरला रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात होणार मुलाखती

रत्नागिरी : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी १४ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत SSB कोर्स क्र. ५८ आयोजित केला जाणार आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदावर भरती होण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी येथे २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील SSB-58 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट व ते पूर्ण भरून घेवून यावे.

एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत. कंम्बाईड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र असावे. एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र. (०२५३) २४५१०३२ किंवा व्हाटसअप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button