रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे १४ जुलैला विद्यार्थ्यांचा गुणगौरव

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे १४ जुलै रोजी विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शहरातील बंदर रोड भागातील कित्ते भंडारी सभागृहात सकाळी १०:३० वाजता होईल.
दहावी परीक्षेत ७५ टक्के, बारावी परीक्षेत ७० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह शिष्यवृत्तीप्राप्त व पदवीधर आणि उच्चशिक्षित विद्यार्थी तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या सर्वांना भंडारी समाज संघातर्फे गौरविण्यात येणार आहे. सुयश प्राप्त विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घेऊन आपली कागदपत्रे ८९८३५२४५९० कार्यालयीन व्हाट्सअप क्रमांकावर १० जुलैपर्यंत पाठवायची आहेत. सर्टिफिकेट पाठवताना त्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव व त्याने कुठल्या विषयात प्राविण्य मिळवले आहे, याची नोंद करणे आवश्यक आहे. तसेच त्याखाली पत्ता व मोबाईल नंबरही नमूद करणे आवश्यक आहे. या बरोबरच गुणपत्रिकेची झेरॉक्स रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ कार्यालय, भागीरथी भुवन, खालची आळी अथवा कांचन फोटो स्टुडिओ, एसटी स्टँड येथे प्रत्यक्ष आणून द्यायची आहेत.
ज्ञातीतील विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घेऊन आपली सर्टिफिकेट त्वरित पाठवावी आणि अधिक माहितीसाठी अध्यक्ष राजीव कीर (९४२२४२९८९८), उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर (९४२२५७६७३६), सचिव चंद्रहास विलणकर (९७६३८२४३११) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



