मुख्य बातमी
नागपूर- मडगाव जं.- नागपूर गाडी धावणार सप्टेंबरपर्यंत

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या नागपूर- मडगाव जं.- नागपूर या गाडीच्या फेऱ्या सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवार आणि शनिवार या दिवशी धावणाऱ्या ०११३९ नागपूर – मडगाव जं. या गाडीच्या सेवेची मुदत २९ जूनपर्यंत, तर गुरुवार आणि रविवार या दिवशी धावणाऱ्या ०११४० मडगाव जं. – नागपूर या गाडीच्या फेऱ्या उद्या (३० जून) संपणार आहे. या गाडीला मिळणार प्रतिसाद पाहता या गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवार आणि शनिवार या दिवशी धावणारी ०११३९ नागपूर – मडगाव जं. या गाडी ही २८ सप्टेंबरपर्यंत, तर गुरुवार आणि रविवार या दिवशी धावणारी ०११४० मडगाव जं. – नागपूर २९ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.
या वाढीव सेवेच्या लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.



