मुख्य बातमीशैक्षणिक

एस. पी. हेगशेट्ये कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे गणेशोत्सव साजरा

मोदक बनविण्याची स्पर्धाही उत्साहात

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे ४ सप्टेंबर रोजी मोदक बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. तसेच आज (५सप्टेंबर) गणपती बाप्पाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

सकाळी महाविद्यालयाच्या परिसरात गणपतीची बाप्पाची सकाळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विधीवत पूजा करून दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर पारंपरिक पद्धतीने आरती, भजन करून सायंकाळी विसर्जन करण्यात आले. या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने काल घेण्यात आलेल्या मोदक स्पर्धेत हॉटेल मॅनेजमेंट विभागातील ३० स्पर्धकांनी सहभाग दर्शवला. यात खुशी चव्हाण – निर्जरा शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तुलसी ठोंबरे – प्राची बळकटे यांनी द्वितीय, तर यश साखळकर – आदित्य दुर्गवळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. आर्या भोसले – सूरज आग्रे आणि प्रतीक करमळकर – गौरेश बांदकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये यांनी केले.

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे, शेफ मेघना शेलार यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी प्रा. अथर्व खांडेकर, प्रा. सोनाली साठे उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button