पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळावा ३ सप्टेंबर रोजी

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टिने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळाव्याचे आयोजन ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता फिनोलेक्स अॕकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, एमआयडीसी, मिरजोळे रोड येथे करण्यात आलेले आहे.
या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांसह सहकारी संस्थाकडील विविध अडीच हजारपेक्षा अधिक पदांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी निवड करण्यात येणार आहे.
जिल्हयातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. नोंदणी केलल्या उमेदवारांनी त्यांचेकडील युझर आयडी व पासवर्डच्या सहायाने ३ सप्टेंबर रोजीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण भरती मेळाव्यामध्ये ऑनलाईन अप्लाय करून रोजगार मेळाव्याचे दिवशी मुलाखतीसाठी त्यांचे बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांव्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया जिल्हा कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडे त्वरीत संपर्क साधून नोंदणी करावी. रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती इनुजा शेख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२३५२-२२१४७८/२९९३८५, ९०७५६०२२८३ या क्रमांकावर संपर्क साधावा.



