बाळासाहेबांची शिवसेना हीच आमची ओळख : शपी भुजबा
शिवसेनेचा पावस जिल्हा परिषद गटात कार्यकर्ता मेळावा

रत्नागिरी : आम्ही कोणाला घाबरत नसून बाळासाहेबांची शिवसेना हीच आमची ओळख असल्याचे पावस मोहल्ल्यातील ज्येष्ठ शिवसैनिक शपी भुजबा यांनी सांगितले.
शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुक्यातील पावस गोळप जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्ता मेळावा महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच महालक्ष्मी पॅलेस येथे घेण्यात आला. या प्रसंगी उत्स्फूर्तपणे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आता कट्टर शिवसैनिक व्हायची वेळ आली असून, आपला कोकण प्रदेश हा शिवसेनेचाच आहे हे दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केले.
या वेळी महाआघाडीचे उमेदवार श्री. राऊत यांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले. या प्रसंगी कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, उदय बने, शेखर घोसाळे, संजय साळवी, संजय पुनसकर, प्रदीप उर्फ बंड्या साळवी, रजन सुर्वे, प्रमोद शेरे, नेहा माने, वेदा फडके, ॲड. श्रीमती आगाशे, वर्षा पितळे, ममता जोशी, साक्षी रावणांग, सायली पवार, प्रसाद सावंत, राकेश साळवी, किरण तोडणकर, हेमंत पवार, सुभाष पावसकर, कोकण संघ उपाध्यक्ष बावाशेठ साळवी, मंगेश साळवी, दीपक राऊत ह्या पदाधिकाऱ्यांबरोबरच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.