मुख्य बातमीशैक्षणिक

संगमेश्वर नवनिर्माण महाविद्यालयात ‘क्रीडा क्षेत्र आणि करिअर संधी’ विषयावर मार्गदर्शन

संगमेश्वर : लोवले येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात नावलौकिक असलेल्या प्रा. सौ. मृणाल पवार यांनी “क्रीडा क्षेत्र आणि करिअर संधी” या विषयावर विशेष मार्गदर्शन केले.

नवनिर्माण महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्राचार्या डॉ. संजना चव्हाण यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी प्राचार्या रूपाली अणेराव, प्रा. संतोष खरे प्रा. अनिल नेमन, प्रा. पृथ्वीराज वाडकर उपस्थित होते. या कार्यक्रमात सौ. मृणाल पवार यांनी क्रीडा क्षेत्र आणि त्यात असलेल्या विविध संधींवर उदाहरणासह विद्यार्थ्यांना सांगून शारीरिक आणि मानसिक फिटनेस कसा आवश्यक आहे, याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

प्राचार्य डॉ. संजना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन आपल्या विविध गुणांना वाव द्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष खरे यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button