
रत्नागिरी : मुलींवरील अत्याचाराचे लोण हळूहळू रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहराकडे वळले असून, आज (२६ ऑगस्ट) सकाळी शहराजवळील चंपक मैदान येथे एक १९ वर्षीय मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.
ही मुलगी शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रशिक्षण घेणारी परिचारिका असून, तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर येताच जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी याचा निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, शहरातील नागरिक ही जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने जमले असून आरोपी लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांना घेराव घातला आहे.



