मुख्य बातमीराजकीय

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली क्षेत्रिय रेल प्रबंधकांची भेट

विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे कोकण रेल्वेकडून आश्वासन

रत्नागिरी : रेल कामगार सेना अध्यक्ष, माजी खासदार, शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय रेल प्रबंधक रवींद्र कांबळे आणि इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत २३ ऑगस्ट रोजी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

रेल कामगार सेना सरचिटणीस दिवाकर देव, कार्याध्यक्ष संजय जोशी, त्याचबरोबर कोंकण रेल्वे सरचिटणीस राजू सुरती, अध्यक्ष शशी नायर, संयुक्त सरचिटणीस मिनाज झारी, खजिनदार विश्वास राणे यांच्यासोबत गजानन गायकर, दत्ता तेलंगे, चंदन गुरव, गणपत दळवी, अशोक शिरोडकर, कौस्तुभ ढेकणे, तेजस थिटे, संतोष कुंभार, रवींद्र गुजर, रवी सावर्डेकर, राकेश सिन्हा, गणेश चाळके आदी पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

या बैठकीत MACPS ची ऑर्डर काढणे, स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य देणे, खूप वेळ स्थगित असलेल्या मुद्दे, पॉईंट्समन लोकांची ट्रान्सफर ऑर्डर काढणे, चुकीच्या पद्धतीने दिलेल्या चार्जेशीट मागे घेण्यात घ्याव्या. रनिंग स्टाफला लवकरात लवकर वॉकी टॉकी (walkei talkie) पुरवणे, रत्नागिरी रिजनमधे चालवण्यात येणाऱ्या मेमूसाठी लोको पायलटना रिलीफ द्यावा किंवा सहाय्यक लोको पायलट द्यावा, या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

या सर्व मुद्द्यांना क्षेत्रिय रेल प्रबंधक रवींद्र कांबळे यांनी तत्वतः मान्यता देऊन या सर्व विषयांवर सकारात्मक निर्णय घेऊ,असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button