मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तराजकीयविधानसभा निवडणूक २०२४
प्रशांत यादव यांनी घेतली माखजन बाजारपेठेत, व्यापाऱ्यांची भेट

संगमेश्वर : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी माखजन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह रहिवाशांची भेट घेतली आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचे आवाहन केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढत आहेत. यापूर्वी माखजन बाजारपेठेतील समस्या व रोजगार वाढीच्या दृष्टीने प्रशांत यादव यांनी माखजन परिसरात भेटी दिल्या आहेत.
यावेळी यादव यांच्यासमवेत योगेश रेडीज, आशिष चोचे, सतीश कुंभार,मोहन घडशी,बाबू मोरे, माजी सभापती दिलीप सावंत, अनंत गुरव, प्रसाद कोकाटे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



