क्रीडामुख्य बातमी
बॅडमिंटन स्पर्धेत नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे यश

रत्नागिरी : येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय १९ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयातील दोन्ही संघ उपविजेते ठरले.
मिळविलेल्या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी, संघ व्यवस्थापक प्रा. रोहित यादव यांचे संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, संचालिका सीमा हेगशेट्ये यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



