क्रीडामुख्य बातमी

राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी रत्नागिरी संघ जाहीर

रत्नागिरी : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित ५८ वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२४-२५ दिनांक १५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत सेन्ट्रल रेल्वे ईनस्टूट हॉल, शंकर मंदिर जवळ, दादर येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हाचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

पुरुष संघ – अभिषेक चव्हाण (कर्णधार), राहुल भस्मे, योगेश कोंडविलकर, अभिजीत खेडेकर, दीपक वाटेकर, विजय कोंडविलकर. महिला संघ – आकांक्षा कदम (कर्णधार), निधी सप्रे, ईशा खैरे, सेजल जाधव, स्वरा मोहीरे, स्वरा कदम. वयस्कर गट – संतोष जोगळेकर, विवेक देसाई. संघ व्यवस्थापक – विवेक देसाई.

रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाला रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सल्लागार सुचयअण्णा रेडीज, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, खजिनदार नितीन लिमये व सेक्रेटरी मिलिंद साप्ते यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button