राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेतर्फे जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : येथील श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, श्री राधाकृष्ण मंदिर यांच्यावतीने १० व ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत श्री राधाकृष्ण चषक रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, वयस्कर गट पुरुष, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट अशा आठ गटांत खेळवली जाणार आहे. या वर्षातील ही तिसरी स्पर्धा आहे.
प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द केली जाईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका बुधवार (७ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात. स्पर्धेत सामना खेळण्यासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टी-शर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत.
जे खेळाडू यावर्षी कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही त्यांनी २०२४-२५ या वर्षाचे नोंदणी शुल्क ५० रुपये जिल्हा असोसिएशनकडे जमा करायचे आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी रुपये १५० रुपये, दुहेरीसाठी २०० रुपये व लहान गटासाठी १०० रुपये असे आहे.
तालुका प्रतिनिधी असे : गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख – राहुल भस्मे (९६५७६३७६७८), चिपळूण – साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजा – मनोज जाधव (७६२०११६७३६), खेड – योगेश आपटे (९९५३२२२६३१), राजापूर – मनोज सप्रे (९४०३७६८३७६ ).
या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून विनय गांगण व सागर कुलकर्णी तसेच स्पर्धा प्रमुख म्हणून मिलिंद दळी हे काम पाहतील. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, सचिव मकरंद खातू, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचयअण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते, राष्ट्रीय पंच सचिन बंदरकर यांनी केले आहे.



