राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी गणराज क्लबची गौरी विलणकर रवाना

रत्नागिरी : सातवी राष्ट्रीय कॅडेट क्युरोगी व पूमसे चॅम्पियनशिप स्पर्धा विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे दिनांक १ऑगस्ट ते ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरीतील गणराज तायक्वांदो क्लबची गौरी विलणकर रवाना झाली आहे.
सातव्या राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत गौरीने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. ही स्पर्धा नुकतीच भद्रावती (चंद्रपूर) येथे झाली. रत्नागिरीतील गणराज तायक्वांदो क्लबमधील गौरी विलणकर हिने ५९ वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. गौरीला प्रशांत मनोज मकवाना, महिला प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्या मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
याआधी गौरीने खेलो इंडिया स्पर्धत सुवर्णपदक प्राप्त केले होते. गौरीला तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, धुळेछंद मेश्राम, खजिनदार व्यंकटेशराव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक शाहरुख शेख, मिलिंद भागवत, रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी, पालक, गणराज क्लबचे पदाधिकारी नुतन कीर, साक्षी मयेकर, कनिष्का शेरे, भगवान गुरव, रंजना मोडूळा, यशंवत शेलार, पूजा कवितके यांनी गौरीला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.



