क्रीडामुख्य बातमी

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकर सुवर्णपदकाची मानकरी

रत्नागिरी : राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा १९ ते २१ जुलै या कालावधीत चंद्रपूर येथे मोठ्या दिमाखात पार पडली. यात रत्नागिरीच्या एसआरके तायक्वांदो क्लबची खेळाडू स्वरा साक्षी विकास साखळकर ही कॅडेट गटात पुमसे प्रकारात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. स्वरा हीने केलेल्या फ्री स्टाइल पुमसेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

राज्यातल्या कानाकोपऱ्यातून अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल झाले होते. या स्पर्धेसाठी स्वरा हिला एसआरके तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वरा इयत्ता सहावीमध्ये शिकत असून दामले शाळेची विद्यार्थिनी आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या स्वरा हिचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, धुळेछंद मेश्राम खजिनदार व्यंकटेशराव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत, रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button