मुख्य बातमीशैक्षणिक

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रन फॉर एचआयव्ही 'अवेरनेस'साठी आयोजन 

रत्नागिरी : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय आणि व एस .पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२४ अंतर्गत जिल्हास्तरीय रेड मॅरेथॉन स्पर्धा झाली.

या स्पर्धेचे उद्घाटन एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, रत्नागिरी जिल्हा एड्स प्रतिबंध विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील,

सह नियंत्रण आणि मूल्यांकन अधिकारी नीतेश पाटील, प्रा. सुकुमार शिंदे, डॉ. पूजा मोहिते, प्रा. सुशील साळवी, प्रा. वर्षा कुबल, प्रा. स्वरा खामकर, समुपदेशक सौ. शीतल कीर, सतीश कांबळे, राहुल खरात, डीएसआरसी समुपदेशक सौ. दीपाली किंजळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. अस्मिता गुरव उपस्थित होते.

मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल असा : मुले – जनमय भिकाजी हरचकर (प्रथम), विपूल विजय निंबरे (द्वितीय), आकाश संतोष धनावडे (तृतीय, मोहिनी मुरारी चाफे कॉलेज, रत्नागिरी). मुली – वृषाली वसंत घाणेकर (प्रथम), प्राची गोविंद घाणेकर (द्वितीय, मोहिनी मुरारी चाफे कॉलेज, रत्नागिरी), मृदुला मंगेश सनगरे (तृतीय, पटवर्धन कॉलेज, रत्नागिरी).

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा स्पर्धेनंतर लगेचच नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button