
रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत यंत्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी तात्पुरत्या स्वरूपात तासिका अधिव्याख्याता पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार असून, या अध्यापक नियुक्तीच्या अनुषंगाने जे अभ्यागत १२ जुलै रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत अशा उमेदवारांसाठीच फक्त परत एकदा ही मुलाखत होईल.
या पदासाठी शैक्षणिक अर्हता बीई प्रथमश्रेणी असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपला अर्ज, मूळ प्रमाणपत्र, झेरॉक्स प्रतीसह २० जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता विस्तारीत इमारत संबंधित बांधकाम विभाग-यंत्र अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथे उपस्थित रहावे, असे शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनी कळविले आहे.



