मुख्य बातमीशैक्षणिक

रत्नागिरी उपकेंद्र येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनाचे उद्घाटन 

नाणीजच्या विद्यार्थ्यांच्या वैदिक मंत्रघोषात कार्यक्रम 

रत्नागिरी : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनाचे उद्घाटन सोमवारी संपन्न झाले. संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते योगभवनाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे आणि वैद्य मंदार भिडे उपस्थित होते.

यावेळी नाणीज येथील गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी वैदिक मंत्रघोष केला आणि याच मंत्र घोषात सुरुवातीला कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते योग भवनाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

योग प्रात्यक्षिक करताना रत्नागिरी उपकेंद्रातील एम ए आणि बी ए योगशास्त्राचे विद्यार्थी

यानंतर उपकेंद्रात योगशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या एमए योगशास्त्र आणि बीए योगशास्त्रच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.

याप्रसंगी रत्नागिरीतील सुपरिचित वैद्य मंदार भिडे यांनी आयुर्वेद, दिनचर्या आणि स्वास्थ्य यावर विस्तृत प्रकाश टाकला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी म्हणाले की आपल्या शास्त्रात विविध विषयाचे अमूल्य ज्ञान आहे केवळ त्याची अंमलबजावणी आपल्या आयुष्यात करणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर नियम पालन करणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन स्वरूप काणे यांनी केले.

 

 

फोटो ओळी

१) रत्नागिरी उपकेंद्रातील लोकमान्य बाळगंगाधर टिळक योगभवनाच्या कोनशीला अनावरण प्रसंगी उपस्थित मध्यभागी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी. सोबत रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, आयुर्वेदाचार्य मंदार भिडे, नाणीज येथील श्री. हितेश गुरुजी, डॉ. गौरव कडलग आणि उपकेंद्रातील प्राध्यापक वर्

२) योग प्रात्यक्षिक करताना रत्नागिरी उपकेंद्रातील एम ए आणि बी ए योगशास्त्राचे विद्यार्थ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button