मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

कोकणात गणेशत्सावासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी लवकर रो- रो जलसेवा सुरू होणार – मंत्री नितेश राणे

रत्नागिरी: रत्नागिरीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या ना. राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि दळणवळण व्यवस्था भक्कम करतानाच रस्ते आणि रेल्वे सोबतच जलवाहतूक वाढावी यासाठी फडणवीस सरकार प्राधान्य देत आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या गणेशोत्सवापर्यंत मांडवा आणि माजगाव येथून रो रो जलसेवा सुरु करण्यात येणार असून तिथून थेट रत्नागिरीपर्यंत तीन तासात तर मालवण, विजयदुर्ग पर्यंत तब्बल साडेचार ते पावणे पाच तासात पोहोचता येणार आहे. या रो रो जलसेवेमध्ये जवळपास 100 गाड्या आणि 500 प्रवासी घेऊन माजगाव येथून सोडणार आहोत. यासाठी लागणारी मोठी बोट किंवा क्रूज महाराष्ट्रात किनारपट्टीकडे आली आहे. फडणवीस साहेब त्याची पाहणी करतील आणि लवकरच गणेश चतुर्थीच्यापूर्वी हि सेवा सुरु करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल असे ना. राणे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button