मुख्य बातमीशैक्षणिक

समत्व ट्रस्टतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी : समत्व ट्रस्ट ठाणे यांच्यावतीने चवे बौद्धवाडी शाळेसह जिल्ह्यातील इतर ३३ शाळांमधील विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी आवश्यकता असणारे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ट्रस्टतर्फे संगमेश्वर, चिपळूण, खेड व रत्नागिरी तालुक्यातील दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे संपूर्ण साहित्य शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम समत्व ट्रस्ट ठाणे यांच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. समत्व ट्रस्ट हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रांमध्ये योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोकणात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्याच्या उद्देशाने प्रयत्नशील आहे. यावर्षी चवे बौद्धवाडी शाळेसह जिल्ह्यातील इतर ३३ शाळांमधील विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी आवश्यकता असणारे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यात १०० व २०० पानी एकरेघी, दुरेघी, चौरेघी वह्या, रंगीत खडू बॉक्स, कंपास पेटी, चित्रकला वही याचा समावेश आहे.
समत्व ट्रस्टचे विश्वस्त तथा मुख्य जनसंपर्क प्रमुख कोकण विभाग नरेंद्र खानविलकर, रत्नागिरी जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. पाटील, समत्व ट्रस्टचे सदस्य रवींद्र महाडिक, शाळा चवे निवईचे किसन शेठ सागवेकर व ओरीचे केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेतील विद्यार्थी व पालकांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या शैक्षणिक साहित्याबद्दल पालकांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक राहुल अलकटवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button