मुख्य बातमी

नवनियुक्त शिक्षण सेवकांचा स्वागत मेळावा उत्साहात

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा – राजापूरतर्फे आयोजन

राजापूर : तालुक्यात मे २०२४ मध्ये नव्याने हजर झालेल्या सुमारे १७४ नवनियुक्त शिक्षकांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या राजापूर शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्वागत समारंभ आयोजित केला होता.

या वेळी जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा सहसचिव महादेव बंडगर, लांजा तालुका अध्यक्ष प्रदीप मडवी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. तालुका सचिव सुरेश रेडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संघटनेची ओळख करून दिली. जिल्हा सहसचिव विशाल घोलप यांनी संघटनेची पार्श्वभूमी व संघटना स्थापनेपासून आजपर्यंत संघटनेनी केलेला संघर्ष अगदी उत्तमरित्या मांडला.

अमीर फकीर यांनी शालेय ऑनलाइन कामाबाबत मार्गदर्शन केले आणि उदय कुलकर्णी यांनी नवनियुक्त शिक्षण सेवकांना प्रशासकीय बाबतीत मार्गदर्शन केले.जिल्हासचिव दत्तात्रय क्षीरसागर यांनी पतपेढीमध्ये सभासद होण्यासाठी आवाहन करून त्यांना पतपेढी तर्फे असणारे लाभ , संघटनेने त्यांच्या नियुक्ती पासून केलेली कामे या बद्दल मार्गदर्शन केले.

जिल्हा सहसचिव महादेव बंडगर यांनी जुन्या पेन्शनची गरज आणि आजपर्यंत झालेली आंदोलने यांची माहिती दिली. तालुका अध्यक्ष जोतीबा पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना ओघवत्या शब्दात मार्गदर्शन केले. संघटनेचे माजी कोषाध्यक्ष रोहिदास रोमन यांनीही मार्गदर्शन केले. नवनियुक्त शिक्षकांमधून प्रातिनिधिक स्वरुपात श्री. अहिरे आणि दर्शना नंदिवाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी सौ. मनीषा सूर्यवंशी यांनी स्वागतगीत सादर केले. सौ. रुपाली नलावडे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा प्रतिनिधी रवींद्र नाडगौडा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष सुनील गोजारे, कोषाध्यक्ष अशोक साळुंके, प्रसिद्धीप्रमुख अमीर फकीर, तालुका संघटक प्रशांत मुंडे, उपाध्यक्ष अमोल घुगे, तालुका सल्लागार तुकाराम भिसे, अरुण हिरवे, संदीप जाधव, जिल्हा प्रतिनिधी हेमंत मोरे, गणेश पाटील, गोविंद बाचीपल्ले,अक्रुदास कुसंगे, प्रसाद दरडे, कादर शेख यांच्यासोबत बीट संघटक, केंद्र संघटक व तालुक्यातील सर्व पेन्शन शिलेदार यांचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button