मुख्य बातमी

बसफेऱ्या चालू केल्या नाहीतर विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करणार

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एसटी प्रशासनाला इशारा

रत्नागिरी : तालुकाभरातील अनेक विद्यार्थ्यांना एसटी बसफेर्‍यांविना सुमारे दोन ते अगदी पाच-सहा किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. बसफे़र्‍या सुरू करण्याकडे एसटी महामंडळाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांची तक्रार घेवून येथील शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) पदाधिका़र्‍यांनी एस. टी. महामंडळाच्या कार्यालयावर धडक मारली. प्रशासनाने चार दिवसांत बसफे़र्‍या सुरू कराव्यात, अन्यथा त्या गावांतील विद्यार्थ्यांना घेऊन एसटी कार्यालयावरील आंदोलनाचा इशारा तालुकाप्रमुख बंडया साळवींनी दिला आहे. रत्नागिरी तालुक्यात अनेक बसफे़र्‍या कोरोना काळापासून एसटी प्रशासनाने बंद केल्या. आजही ग्रामीण भागातील त्या बसफे़र्‍या सुरू झालेल्या नाहीत.
तालुक्यातील उंबरे, हरचेरी, भोके, चिंद्रवली, मिरजोळे आदी भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करण्याची वेळ येत आहे. तसेच सार्वजनिक किंवा रविवार सुट्टीच्या दिवशी देखील शहरीसह ग्रामीण भागातील अनेक बसफे़र्‍या बंद ठेवल्या जातात. त्याचा या भागातील ग्रामस्थांना फटका बसत आहे. रत्नागिरी शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक बसफे़र्‍या कोरोनानंतर कमी करण्यात आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े; मात्र प्रवासी भारमान कमी असल्याचे सांगत या फे़र्‍या बंद ठेवण्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. या होणा़र्‍या गैरसोयीबद्दल शिवसेनेच्या पदाधिका़र्‍यांनी माळनाका येथील एसटीच्या विभागीय कार्यालयात धडक दिली.
उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे आणि तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या नेतृत्वाखाली उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, माजी जि.प. सदस्य महेंद्र झापडेकर, विभागप्रमुख राकेश साळवी, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, विभागप्रमुख विजय देसाई, यांच्यासह हरचेरी येथील चंद्रशेखर मांडवकर, दत्ताराम इरीम, नासीर मुकारी, उंबरे येथील विनोद उकीर्डे, सोलीम, तसेच भोके, फणसोप येथील ग्रामस्थही उपस्थित होते. या पदाधिका़र्‍यांनी एसटी विभाग प्रशासनातील अधिकार्‍याचीं भेट घेत या प्रश्नी चर्चा केली. आगारप्रमुख श्री. पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेवेळी एसटी बसेस रत्नागिरी डेपोमध्ये कमी असल्याने ग्रामीण भागात बसफे़र्‍या कमी पडत असल्याने बंड्या साळवी यांनी सांगितले. त्याबाबत या प्रशासनाने तातडीने वरिष्ठ प्रशासनाला कळवून बसफेऱ्या सुरू करण्याबाबत चर्चा केली. येत्या चार दिवसांत हरचेरी, उंबरे, भोके, चिंद्रवली या भागातील विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरणा़र्‍या बसफेऱ्या सुरू कराव्यात अन्यथा या भागातील विद्यार्थी, ग्रामस्थांसह येथील एसटी कार्यालयात येवून आंदोलन करू, असा इशारा यावेळी शिवसेनेतर्फे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button