महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या रत्नागिरी शाखेतर्फे मेळावा संपन्न

रत्नागिरी : पवित्र पोर्टल भरतीच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यामध्ये ५४ नवनियुक्त शिक्षणसेवक गेल्या मे महिन्यामध्ये रुजू झाले आहेत. त्यांचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा रत्नागिरीच्या वतीने स्वागत करण्यासाठी विभागवार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील सर्व नवनियुक्त शिक्षणसेवक उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेचे महत्त्व, संघटनेने केलेली कामे तसेच प्रशासकीय शालेय कामकाज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त करून जुनी पेन्शनच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष अंकुश चांगण, महिला जिल्हा आघाडी प्रमुख सौ. विभा बाणे, जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय क्षीरसागर जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत पाटील, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख महेंद्र ढाकणे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राहुल अलकटवार, तालुका नेते शिवाजी घुटे, तालुका कार्याध्यक्ष तुकाराम मुरकुटे, तालुका सरचिटणीस भाऊसाहेब काटे तालुका कोषाध्यक्ष रामनाथ बने, तालुका उपाध्यक्ष अवधूत शिंदे, महिला तालुका आघाडी प्रमुख सौ. वृषाली हेळेकर, तालुका महिला आघाडी प्रतिनिधी सौ. अक्षदा सायगांवकर, तालुका संघटक नवनाथ कुटे, तालुका प्रसिद्धप्रमुख सुजित वाफेलकर, तालुका सहसचिव गणपती पडूळे, हातखंबा विभाग प्रमुख वैजनाथ जाधव, गणपतीपुळे विभाग प्रमुख गोविंद डुमनर व अनंत चाटे, शिरगाव विभागप्रमुख मोसिन आत्तार, केंद्र संघटक अशोक दाताळ व राहुल दुधाळे, परमेश्वर अलापूरे, सचिन पाटील, महेश जाधव, अण्णा गाटे, जयदत्त तकीक, श्रीकांत भडंगे, कल्याण कदम, माधव अंकलगे, अनंत चाटे, श्री. मुंडे, मारोती फड, सत्यवान गायखे, अजय गावडे, महिला पेन्शन फायटर सौ. धानेश्वरी स्वामी, सौ. अनिता मोरगे यांसह जाकादेवी, खंडाळा व रत्नागिरी असे तालुक्यातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे सर्व पेन्शन फायटर्स या स्वागत समारंभासाठी उपस्थित होते. पेन्शन फायटर रामनाथ बने, विक्रम पाटील व गोविंद डुमनर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



