मुख्य बातमीशैक्षणिक

संगमेश्वरात शालेय वस्तूंचे वाटप

संगमेश्वर : निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप आणि संगमरत्न फाउंडेशन (NGO) यांच्या वतीने ‘आनंदाने देऊया समाजाचं देणं’ या उपक्रमांतर्गत येथील कळंबस्ते केंद्र आणि काही शाळांमध्ये शालेय वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले.

आपण समाजाचे देणे लागतो हा मुख्य उद्देश समोर ठेवून संगमरत्न फाउंडेशनमार्फत असे उपक्रम राबविले जातात. या वेळी जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक मराठी शाळा धामापूर, शेनवडे, अंत्रवली केंद्र शाळा, कळंबस्ते केंद्रामधून, वाडावेसराड, तेलेवाडी भीमनगर, कळंबस्ते क्र. २ (केंद्रशाळा), उमरे बाईतवाडी, उमरे क्र. १ या शाळांचा समावेश होता. या कार्यक्रमाला निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप प्रमुख संदेश जिमन, नीतेश मालप, विशाल तावडे, प्रणय होडे यांच्यासोबतच संगमरत्न फाउंडेशनचे (NGO) अल्पेश सोलकर, तेजस्वी जावकर, अतुल करपे, प्रशांत आदी पदाधिकारी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ आदींनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button