मुख्य बातमी

ॲड. निरंजन डावखरेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे आवाहन

रत्नागिरी : गुजरातच्या सीमेपासून खाली दोडामार्गपर्यंत विस्तारलेला आणि ३६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेला विधान परिषदेचा कोकण पदवीधर मतदारसंघ हा आहे. गेली १२ वर्षे ॲड. निरंजन डावखरे या मतदासंघाचे नेतृत्व करत असून यावेळीही त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले.

रत्नागिरीतील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण महाविद्यालयाला आज (१८ जून) त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजप शहराध्यक्ष राजन फाळके, मनोज पाटणकर उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले, व्याप्ती मोठी असली तरी या मतदार संघात मतदारांची संख्या मर्यादीत आहे. सुरुवातीला केवळ ५० ते ६० हजार मतदार संख्या असलेल्या या मतदारसंघात आज २ लाख ३० हजार मतदार आहेत, ही चांगली बाब आहे. या मतदारसंघ पारंपरिक विचारधारेबरोबर राहिला आहे. १२ वर्षे स्व. वसंतराव पटवर्धन, अशोकराव मोडक हे या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यानंतर ६ वर्षे संजय केळकर आमदार होते. गेली १२ वर्षे निरंजन डावखरे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदासंघात त्यांनी चांगले काम केले आहे.”

चुकीच्या मतदानामुळे १२ ते १५ टक्के मते बाद होतात असे सांगून मतदान कसे करावे या विषयी उपस्थित शिक्षकांना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. पंडित यांनी मनोगत करून ॲड. डावखरेंना विजयी करण्याचे आवाहन केले.

नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारने काळजीपूर्वक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button