मुख्य बातमीलोकसभा २०२४

राजकीय कार्यकर्त्यांना स्कॅन करावा लागणार क्यूआर कोड

मतमोजणीच्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांचा बंदोबस्त

रत्नागिरी : उद्या (४ जून) होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी उमेदवार समोरासमोर येऊन वाद निर्माण होऊ नयेत यासाठी पोलिसांनी राजकीय पक्षांसाठी स्वतंत्र जागा नेमून दिल्या आहेत. हे करताना त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला असून, मतमोजणीच्या ठिकाणी जाताना राजकीय कार्यकर्त्याला क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मॅपच्या सहाय्याने कार्यकर्त्याला मतमोजणीसाठी जाता येणार आहे.

उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होईल. प्रतिस्पर्धी कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर होणाऱ्या वादाचे प्रसंग टाळण्यासाठी पोलिसांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी यश हॉटेल समोर अनंत भाटकर यांच्या घरासमोरील मोकळा परिसर नेमून दिला आहे. महायुटीसाठी कोकण रेल्वेच्या विभागीय कार्यालयासमोरील जीएफ कंपनीची मोकळी जागा दिली आहे, तर उर्वरित बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, वंचित आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसाठी श्री सिद्धिविनायक लॉंड्री सर्व्हिसेस समोरील मोकळी जागा नेमून देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना सोबत मोबाईल, हत्या, सिगारेट, लायटर आणि धूम्रपानाच्या वस्तू नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी नेमून दिलेल्या जागेवर कार्यकर्त्याला पोहोचण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पोलिसांनी तीन क्यूआर कोड स्कॅन तयार केले आहेत. महाविकास आघाडी, महायुती आणि अन्य पक्षाचे उमेदवार यांच्यासाठी प्रत्येकी एक क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांना हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर मॅपच्या सहाय्याने कार्यकर्त्याला त्यांच्या पक्षाला नेमून दिलेल्या जागेवर पोहोचता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button