नवनिर्माण महाविद्यालयाचा निकाल ९५.३५ टक्के

रत्नागिरी : येथील नवनिर्माण कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल ९५.३४ टक्के लागला आहे. यात कला शाखेतून वैष्णवी सुनील बांडागळे (६९ टक्के), सृष्टी प्रकाश पाडावे (६६ टक्के), ख़ुशी रामू चव्हाण (६१.६७ टक्के), वाणिज्य शाखेतून जय हरेश पटेल (७८ टक्के), निधी विनोद गावकर (७२.६८ टक्के), लुकमान खलील पटेल (६६.५० टक्के), तर विज्ञान शाखेतून स्वरूप प्रमोद रेंदाळकर (९२.८३ टक्के), सोहम सोनू पानगले (९०.६७ टक्के) आणि राहुल उमेश जोशी (८५.१७ टक्के) यांनी महाविद्यालयातून प्रथम तीन क्रमांक पटकावण्याचा मान मिळविला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नवनिर्माण महाविद्यालयातून कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांतून एकूण २०२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यातील १९६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ९५.३४ टक्के लागला. वाणिज्य शाखेचा निकाल ९८.११ टक्के, तर विज्ञान शाखेचा निकाल ९२ टक्के लागला.
नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



