राज्यस्तरीय तायकोंदो चॅम्पियनशिपमध्ये स्वरा साखळकरला दोन पदके

रत्नागिरी : महाराष्ट्र स्टेट ओपन तायकॉन्दो चॅम्पियनशिप २०२४ रत्नागिरीतील रॉयल हॉल (एमआयडीसी) येथे नुकतीच आयोजित केली होती. या स्पर्धेत रत्नागिरीतील एसआरके तायकॉन्दो क्लबची खेळाडू स्वरा विकास साखळकर हिने फ्री स्टाईल पुमसे प्रकारात कास्य, तर वैयक्तिक पुमसे प्रकारात रौप्यप अशा दोन पदकांची कमाई केली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ७५० खेळाडू सहभागी झाले होते.
स्वराला एसआरके तायकॉन्दो क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभले. स्वरा ही इयत्ता पाचवीमध्ये शिकत असून शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, तायक्वांडो प्रशिक्षक प्रशांत माकवाना मिलिंद भागवत एसआरके तायक्वांदो क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, खजिनदार अंजली सावंत, सचिव शीतल खामकर व इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



